Ad will apear here
Next
‘वेदा कॉलेज’ची एनडी फिल्म वर्ल्डला भेट


पुणे : आझम कॅंपसच्या पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अ‍ॅंड आर्ट्सतर्फे एनडी फिल्म वर्ल्ड भेट दौऱ्याचे आयोजन केले होते.

‘बीएससी मीडिया ग्राफिक आणि अॅनिमेशनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. एनडी फिल्म वर्ल्ड हे एक उत्तम वास्तुशिल्पकाराचे अतिशय सुंदर उदाहरण आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासासंदर्भात माहिती देणे आणि त्याची प्रक्रिया जाणून घेणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता', असे ‘वेदा’ महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषी आचार्य यांनी सांगितले.

‘या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी दिग्दर्शक नितीन देसाई यांच्याकडून टाउन स्क्वेअर सेट, अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित हॉरर मूव्ही, हॉरर सीरियल, शूटिंगसाठी बनविलेले एक अनोखे घर, संत विठ्ठलाची विशाल संरचना यांविषयी माहिती घेतली. तसेच हिंदी सिनेमाचे मूल्य समजून घेतले,’ असे या उपक्रमाचे आयोजक स्वतंत्र जैन यांनी सांगितले.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्टोरी बोर्ड, आर्ट आणि डिझाइन्स, ठिकाणाची निवड, पटकथा, रिअल टाइम नाटक आणि अभिनय, ध्वनी प्रणाली, प्रकाशाची परिणामकारकता, स्टेज व्यवस्था या बाबतची सविस्तर माहिती मिळाली. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZZNBR
Similar Posts
‘वेदा’तर्फे इंडस्ट्री व्हिजिटचे आयोजन पुणे : आझम कॅंपस येथील पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाईन अ‍ॅंड आर्ट्सच्या वतीने (वेदा) इंडस्ट्री व्हिजिटचे आयोजन करण्यात आले होते.
‘एमसीई’मध्ये रक्तदान शिबिर पुणे : पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स, डिझाइन अ‍ॅंड स्कूल ऑफ आर्ट (वेदा) आणि एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्या वतीने नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.
इनामदार महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय वाणिज्य परिषद पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातर्फे ‘व्हिजन इंडिया २०३०’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वाणिज्य परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले असून, राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्या हस्ते १८ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार आहे
अल्पसंख्याक समाजातील गुणवंतांचा सत्कार पुणे : राज्यभरातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी, सीख या अल्पसंख्याक समाजातील दहावी परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सत्कार अवामी महाज या सामाजिक संस्थेतर्फे तसेच हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language